चांदोरी : शासनाच्या तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल चांदोरी या शाखेने नियोजीत ११ मानके पूर्ण केले असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या उपाय योजना केल्या आहेत.गावातून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या, तंबाखू बंदी पोस्टर्स व फलक तयार करून गावात व शालेय परीसरात फेरी काढण्यात आली. शालेय परीसरात फलक लावण्यात आले. शाळेत प्राचार्य पी. बी .चौरे यांनी सर्वांना तंबाखू बंदीचा आदेश दाखवून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगीतले, शाळेत तंबाखू नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्र म घेणतात आला , निफाड उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भामरे यांनी शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांची मुख तपासणी केली. विद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. यासाठी शाखेचे प्राचार्यपी.बी. चौरे , उपमुख्याध्यापक आर. व्ही .रोहमारे , पर्यवेक्षक बी . ए. शेलार आदींसह शिक्षकांनी परीश्रम घेतले.
चांदोरीच्या न्यू इंग्लीश स्कुलमध्ये तंबाखू मुक्तीसाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 5:55 PM