आज ४३ हजार विद्यार्थ्यांची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:28 AM2018-02-18T01:28:31+5:302018-02-18T01:29:25+5:30
नाशिक : पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. १८) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच पेपर सोडवावे लागणार आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ४३ हजार ६०४ विद्यार्थी दोन्ही गटांत प्रविष्ट झाले आहेत.

विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी आदी भाषांतील कार्बनलेस उत्तरपत्रिका दिल्या जाणार असून, यंदा तीनऐवजी दोनच पेपर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेनंतर शिष्यवृत्ती पात्रतेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.
या परीक्षेसाठी पाचवीचे २४ हजार ६४४ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यांची परीक्षा वेगवेगळ्या १५३ केंद्रांवर आसनव्यवस्था केलेली आहे. तसेच आठवीच्या १८ हजार ९६० विद्यार्थ्यांची १२४ केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा नियोजन नियंत्रणासाठी केंद्रनिहाय संचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, शुक्रवारी (दि.१६) शासकीय कन्या शाळेतून त्यांना परीक्षा साहित्य वितरीत करण्यात आले आहे.