पायी वारीबाबत आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:31+5:302021-06-16T04:19:31+5:30
जिल्ह्यात ५२ ठिकाणी पाण्याचे टॅंकर्स नाशिक: मान्सूनचे आगमन झाले असले तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी एकूण ५२ टँकर्स ...
जिल्ह्यात ५२ ठिकाणी पाण्याचे टॅंकर्स
नाशिक: मान्सूनचे आगमन झाले असले तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी एकूण ५२ टँकर्स सुरू आहेत. जिल्ह्यातील ७१ गावांसह ४५ वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. रोज १२०पेक्षा अधिक टँकर्सच्या फेऱ्या केल्या जात असून, या माध्यमातून सुमारे एक लाख ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत आहे.
भातशेतीच्या मशागतीला सुरुवात
नाशिक : इगतपुरी तालुक्यात अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे येथील भात शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील शेतकरी भाताचे पीक घेत असून, पावसावरच त्यांची शेती अवलंबून आहे. मान्सूनपूर्व पावसाबरोबरच अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे तालुक्यात भात शेतीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे.
शिवसेनेच्या वतीने आज सिडकोत रक्तदान
नाशिक : शिवसेना सिडको विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिर, गजानननगर, शुभम पार्क मागे या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी यांनी दिली. शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
न्युट्रिफीड बियाणांचे गिरणारे येथे वाटप
नाशिक : पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ गिरणारे येथे जिल्हा परिषद सेस निधीतून वैरण विकास योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदानावर न्युट्रिफीड बियाणांचे वाटप करण्यात आले. पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, सहायक आयुक्त डॉ. शहाजी देशमुख, पशुधन विकास अधिकारी डॉ. भगवान पाटील यांच्या हस्ते बियाणांचे वाटप करण्यात आले.