एकूण १०३ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 01:47 AM2019-07-03T01:47:28+5:302019-07-03T01:47:39+5:30
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी (दि.२) दाखल झालेल्या २२ उमेदवारी अर्जांसह आतापर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे १०३ अर्ज दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी (दि.२) दाखल झालेल्या २२ उमेदवारी अर्जांसह आतापर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे १०३ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र याच पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी मंगळवारी अमावास्या असल्याने अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पुढे ढकला आहे. त्यामुळे बुधवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची रीघ लागण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी मंगळवारी केवळ एकच अर्ज दाखल झाला असून, विश्वस्तांच्या जागेसाठी ९, संचालकसाठी ११ व स्त्री संचालकसाठी एक अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आत्तापर्यंत तब्बल १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात रविवारी २२, सोमवारी ५७, तर मंगळवारी दाखल झालेल्या २२ अर्जांचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्र्रक्रियेत एकूण २२ अर्ज दाखल झाले असले तरी यात पदाधिकाºयांच्या जागांपैकी उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मण जायभावे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. अर्ज स्वीकृतीची मुदत बुधवारी संपणार असून, मुदत संपण्यास केवळ एक दिवस शिल्लक असतानाही मंगळवारी के वळ अमावास्या असल्यामुळे पदाधिकाºयांच्या जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करणे टाळल्याचे दिसून आले. त्यामुळे अर्ज स्वीकृतीच्या अखेरच्या दिवशी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची रीघ लागण्याची शक्यता आहे.निवडणूक बिनविरोध व्हावी क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यापार्श्वभूमीवर संस्थेच्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील एकत्रित विकासात्मक वाटचालीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन ज्येष्ठ सभासदांनी केले आहे. शिक्षणात आमूलाग्र बदल होत असताना गुणात्मक व सामाजिक उपयुक्ततेसाठी ‘क्रांतिवीर व्हिजन २०५०’पर्यंतचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने एकत्रित प्रयत्नांसाठी समाजधुरिणांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे ज्येष्ठांनी म्हटले आहे.