रेल्वे रुग्णालय असुविधांच्या ट्रॅकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:05 PM2020-09-05T23:05:29+5:302020-09-06T01:05:16+5:30
मनमाड : विभागातील कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा देणारे मध्य रेल्वे रुग्णालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या रुग्णालयाचा कारभार अवघे एक वैद्यकीय अधिकारी व तीन नर्सच्या भरोशावर सुरू असून, पॅथॉलॉजी लॅबला टाळे लावण्यात आले असल्याने असुविधांच्या ट्रॅकवर असलेल्या या रुग्णालयामुळे रेल्वे कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गिरीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : विभागातील कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा देणारे मध्य रेल्वे रुग्णालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या रुग्णालयाचा कारभार अवघे एक वैद्यकीय अधिकारी व तीन नर्सच्या भरोशावर सुरू असून, पॅथॉलॉजी लॅबला टाळे लावण्यात आले असल्याने असुविधांच्या ट्रॅकवर असलेल्या या रुग्णालयामुळे रेल्वे कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मध्य रेल्वेचे जंक्शन स्थानक व रेल्वे पूल कारखान्यामुळे देशाच्या नकाशावर वेगळी ओळख असलेल्या या शहरात रेल्वे कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणावरील संख्या पहाता गेल्या ७५ वर्षांपूर्वी भव्य अशा रेल्वे रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. दिवसेंदिवस रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रुग्णलयाला आता अखेरची घरघर लागली आहे. तीन वैद्यकीय अधिकाºयांची मंजुरी असलेल्या या मोठ्या रुग्णालयाचा कारभार सध्या केवळ एकाच डॉक्टरच्या भरोशावर सुरू आहे. तीन परिचारिका येथे कार्यरत आहेत. या रुग्णालयात रक्त, लघवी, थुंकी तसेच अन्य चाचण्या करण्यासाठी प्रशस्त पॅथॉलॉजी लॅब होती. गेल्या काही वर्षांपूर्वी या प्रयोगशाळेला कुलूप लावण्यात आले. ही लॅब बंद केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तपासणीचे काम शहरातील खासगी पॅथॉलॉजी लॅबला दिले होते. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे सध्या ही सेवा बंद झाल्याने रक्त-लघवीच्या तपासणीसाठी रेल्वे कर्मचाºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. उगावपासून पानेवाडीपर्यंत पुणे मार्गावर अनकाई स्टेशनपर्यंतचे कार्यक्षेत्र असलेल्या या रुग्णालयावर तब्बल तीन हजार कर्मचाºयांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. एकेकाळी सुसज्ज व रुग्णसेवेसाठी राज्यात ख्याती असलेल्या या रुग्णालयाची आजची स्थिती अत्यंत दयनीय आहे. रुग्णालयात केवळ किरकोळ आजारांवर सुविधा मिळत आहेत.
रेल्वे रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने येथे हृदयरोगासंबधी दाखल झालेल्या रुग्णांना येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र सध्या ती सुविधा बंद असल्याने रेल्वे कर्मचाºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.मनमाड येथील रेल्वे रुग्णालयात रक्त- लघवी तपासणी सुविधा नसल्याने कर्मचाºयांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत संघटनेच्या वतीने रेल्वे महाप्रबंधकांकडे तक्रार करण्यात आली आहे.
- सतीश केदारे, झोनल सचिव,
एससी-एसटी रेल्वे एम्पलॉइज असो.