अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा खामखेडा ग्रामस्थांकडून पुन्हा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 07:09 PM2019-09-10T19:09:32+5:302019-09-10T19:09:47+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील गावात श्रीराम मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्तआहाची सांगता झाली
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील गावात श्रीराम मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्तआहाची सांगता झाली
पूर्वी खामखेडा गावात राम मंदिरात भाद्रपद महिन्यात शु.पंचमीपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत होते, परंतु हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या पस्तीस वर्षांपासून बंद झाला होता.
मात्र या वर्षी खामखेडा येथील पुरातन मंदिराच्या जागेवर नवीन राममंदिर बांधून त्यात नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थानी बंद पडलेला अखंड हरिनाम सप्ताह सुरु करण्याची कल्पना पुन्हा कृतीत आणली.
येथील भजनी मंडळ व ग्रामास्थाच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे नव्याने आयोजन करण्यात आले. या सप्ताहकाळात दररोज पहाटे चार वाजता काकडा भजन, सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, रात्री नऊ वाजता नामवंत किर्तनकाराचे कीर्तन आदी धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता संजय धोंडगे यांच्या काल्याच्या कीर्तन सांगता करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी भजन मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.