एचएचजेबी तंत्रनिकेतनाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:33+5:302021-09-03T04:15:33+5:30
तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्षाच्या चार अभ्यासक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग (रेग्युलर) या अभ्यासक्रमाची विद्यार्थी श्रुतिका वाघ ...
तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्षाच्या चार अभ्यासक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग (रेग्युलर) या अभ्यासक्रमाची विद्यार्थी श्रुतिका वाघ (९३.०७ टक्के), द्वितीय वर्षाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी हर्षल बच्छाव (९३.८७ टक्के), तृतीय वर्षाच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी साहिल छोरिया (९७.२६ टक्के) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ओमकार कर्डिले (७५.६८ टक्के), द्वितीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी रिंकू पवार (८५ टक्के), तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी छोरिया साहिल (९७.२६ टक्के), प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची वृषाली शिंदे (९१.३८ टक्के), द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा हर्षल बच्छाव (९३.८७ टक्के), तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा अक्षय मंडलिक (९५.४३ टक्के), द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची श्रुती दळवी (८७.६० टक्के), तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (शिफ्ट) या अभ्यासक्रमाची कोमल बाविस्कर (९६.२९ टक्के), प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा विद्यार्थी यश निकम (८६.६३ टक्के), द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंगची सविता देसले (८३.३३) टक्के, तृतीय वर्षाचा आकाश बोरगुडे (८८.४७ टक्के) यांच्यासह विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. व्ही .ए. वानखेडे, एच. एस. गौडा, डी. व्ही. लोहार, एस.एस. चोरडिया, एन.आर. ठाकरे व कमलेश गुप्ता व श्रीमती चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्ष बेबीलाल संचेती, अजितकुमार सुराणा, दिनेशकुमार लोढा, जवाहरलाल आबड, अरविंदकुमार भन्साळी, राजकुमार बंब, झुंबरलाल भंडारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.