यंदा चांदोरी येथील पारंपरिक बोहाडा उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 09:41 PM2020-07-05T21:41:08+5:302020-07-05T21:44:24+5:30
चांदोरी : येथे दरवर्षी बोहडा उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना पाशर््वभूमीवर या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय उत्सव पंचकमिटी व स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदोरी : येथे दरवर्षी बोहडा उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना पाशर््वभूमीवर या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय उत्सव पंचकमिटी व स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
अंदाजे तीनशे वर्षांपासून बोहडा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यामध्ये विविध देव देवता, राक्षसाचे सोंग घेऊन संबळ, पिपाणीच्या गजरात नृत्य केले जाते. गोदावरी काठी असलेल्या चांदोरी या गावातील बोहडा उत्सवाला अनेक पैलू लाभलेले आहेत. ऐतिहासिक समजला जाणारा हा उत्सव यंदा रद्द केल्याने बोहडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पर्जन्याच्या आर्जवासाठी ग्रामीण भागात पूर्वी आखाडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. यामध्ये
निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली (टेंभे) पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात. कागदाचा लगदा व जंगली झाडपाला वापरून देव-दानवांचे मुखवटे तयार केलेले असतात. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंगे काढली जातात. गणपती, सरस्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबुमाळी, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्र मराजा, एकादशीदेवी-राक्षस, भस्मासूर-मोहिनी, इंद्रजीत-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासूर-शंकर, भीमा-जरासंध, रावण-राम लक्ष्मण, वीरभद्र-दक्षप्रजापती, नरसिंह-हिरण्यकश्यपू अशा सोंगांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जगदंबा व महिषासुराच्या युद्धात त्याचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणुकीने यात्रेची सांगता होते. मात्र, या वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हा उत्सव रद्द करण्यात आल्याचे चांदोरी येथील पंचकमिटी व गाव प्रशासनाने सांगितले.कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून या वर्षी आखाडी (बोहडा) उत्सव रद्द करण्यात आला आहे. बोहडाप्रेमींचा यंदा हिरमोड झाला असून, पुढील वेळी मोठा उत्सव जलोषपूर्ण वातावरणात साजरा करू.
- देवराम निकम, बोहडा संयोजक, चांदोरी