पेठ : एकविसाव्या शतकात जवळपास सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा होणारा वापर कृषी क्षेत्रातही केला जात असून आता प्रतिष्ठीत शेतकऱ्यांबरोबर सामान्य शेतकरीही आता आधुनिक कृषी तंत्रज्ञानचा वापर करू लागल्याने पारंपरिक मशागतीच्या पध्दती दुर्मिळ होत चालल्या आहेत.आदिवासी भागात भात व नागली ही दोन मुख्य पिके घेतली जातात. या पिकांची मळणीसाठी खळ्यावर मध्यभागी एक लाकडी दांडा ठोकून त्या भोवताली बैलांना फिरवून भाताची मळणी केली जात असते. आता त्याची जागा ट्रॅक्टर व मशीनने घेतली असली तरी अजूनही दुर्गम भागातील शेतकरी भात व नागालीची मळणी करण्यासाठी पारंपारिक पध्दतीचा वापर करतांना दिसून येतात.जनावरांच्या शेणकूटाने खळ्याची सारवण करून त्यावर कापणी केलेले तांदुळ पसरवले जातात. चार-पाच बैलांची दावण तयार करून त्यावरून फिरवतात. नंतर वाºयाच्या दिशेचा वेध घेऊन धान्य उपणणी केली जाते. त्यामुळे कमी खर्चात व सुरक्षित मळणी होत असली तरी शेतकऱ्यांना यामध्ये अधिक कष्ट करावे लागतात.
पारंपारिक भात मळणी होऊ पाहतेय दुर्मिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:10 PM
पेठ : एकविसाव्या शतकात जवळपास सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा होणारा वापर कृषी क्षेत्रातही केला जात असून आता प्रतिष्ठीत शेतकऱ्यांबरोबर सामान्य शेतकरीही आता आधुनिक कृषी तंत्रज्ञानचा वापर करू लागल्याने पारंपरिक मशागतीच्या पध्दती दुर्मिळ होत चालल्या आहेत.
ठळक मुद्देपेठ : आधुनिकता-वाढत्या कृषी तंत्रज्ञानाने पारंपारिक पध्दती दृष्टीआड