नदीवरील पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वाहतुक असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 07:18 PM2019-07-17T19:18:23+5:302019-07-17T19:19:12+5:30
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील नदीवरील केटीवेअर बंधाऱ्याच्या पुलाला संरक्षण कठडा नसल्याने नागरीकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करु नही याकडे पांटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने येथील नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बंधार्यावर संरक्षण कठडा बांधुन तेथील नागरीकांना न्याय देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाऊले उचलावीत.

या धरणाच्या पुलावरु न येथील परिसरातील विद्यार्थी, शेतकरी ये-जा करज असतात. परंतु या धरणावर संरक्षण कठडाच नसल्याने जीव मुठीत धरु न येथुन वावर करावा लागत आहे. शेतकामासाठी लागणारे मजुर तसेच शाळकरी विद्यार्थी याच पुलावरु नियमित ये-जा करत असतात.
मागील महिन्यात येथे एक ९ वर्षाचा शाळकरी मुलगा बुडुन मृत्यु पावलेला आहे. सदरचे कुटुंब आदीवासी असल्याने त्यांची दखल कोणत्याही प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे या बंधाºयावर तात्काळ संरक्षण कठडा बांधण्यात येणे गरजेचे आहे.
सद्या पावसाळाचे दिवस असल्याने नदीला पुर आल्यानंतर येथुन ये-जा करणे अत्यंत जिकीरीचे होणार आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर संरक्षण कठाडे बसवुनधोका दूर करावा अशी मागणी केली जात आहे.
पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येथुन ये-जा करणाºया शाळकरी विद्यार्थी, शेतमजुर, रहिवाशी यांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला असल्याचे ग्रामस्थ भिती व्यक्त करीत आहेत.
पुलाला संरक्षण कठडे नसल्याने वाहनधारकांचा ऐन पावसाळ्यात जीव टांगणीला लागला आहे. सध्या पावसाळा सुरू असून नदी-नाल्यांना पावसानंतर केव्हाही पूर येऊ शकतो. असे असताना कठडे नसलेल्या पुलावरून जाताना विशेषत: पायी दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला लागतो. कहर म्हणजे अरुंद, कठडे नसलेल्या या पुलावर कोणतेही दिशादर्शक फलक देखिल लावलेले नाहीत. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाटबंधारे विभाग, नांदुरमध्यमेश्वर येथील अधिकारी वर्गास वारंवार याबाबत कळवुनही या बंधाºयावर संरक्षण कठड्याचे कामकाज जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कठड्यअभावी जर एखादी दुर्घटना घडली तर त्यास सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार राहील. पुढील दिवसांत या बंधाºयावर संरक्षण कठड्याचे कामकाज पुर्ण केले नाही तर आम्ही ग्रामस्थ रस्तयावर उतरु.
- विजय गिते, माजी उपसरपंच, खेडला.
(फोटो १७ खेडलेझुंगे, १७ खेडलेझुंगे१)