नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मार्फत घेण्यात येणाऱ्या उन्हाळी सत्र २०२० परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याची मागणी स मेडिकल स्टूडंट वेल्फेअर असोसिएशन व वैद्यकीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आहे.वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासंदर्भात २२ व २५ मे रोजी मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच राज्यपाल यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू व परीक्षा नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले असल्याचा दावा मेडिकल स्टूडंट वेल्फेअर असोसिएशन व वैद्यकीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोनाची वाढती परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे योग्य नाही. लॉकडॉऊन मुळे विद्यार्थी मूळ गावी गेले आहेत. त्याचप्रमाणे काही शहरात पुन्हा नव्यानं लॉकडाऊन घोषित केला आहे. अशा वेळेस विद्यार्थी एका शहरातून दुसºया शहरात येण्यासाठी एसटी व रेल्वे पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितत परीक्षेला येणाºया विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक भीती आहे. तसेच शरात येणाºया विद्यार्थ्यांच्या होस्टेल मेसच्या समस्या आहेत. तरीही आरोग्य विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. अशा काळात सर्व वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी मानसिक तणावाखाली असल्याचे नमूद करीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय शाखेच्या परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. परंतु विद्यापीठाला पत्रव्यवहार करूनही आरोग्य विद्यापीठाने प्रतिसाद ना देता उलट विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत करून करोना झाल्यास एक लाख रुपये व विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये असेकोवीड सुरक्षाकवच जाहीर केल्याचा आरोप विद्यार्थी संगटनेने केला आहे. त्याचप्रमाणे दिनांक ५ व १२ जूनला संघटनेकडून सर्व वैद्यकीय शाखेच्या परीक्षा रद्द न झाल्यास महाराष्ट्रातील पदवी व पदव्युत्तर शाखेचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर बेमुदत संपावर जातील असा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार सर्व वैद्यकीय शाखेच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाने कारवाई केली नाही तर महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय शाखेचे पदवी व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर कोणत्याही क्षणी संपावर जातील असा इशारा मेडिकल स्टूडेंट वेल्फेअर असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.
परीक्षा रद्द न झाल्यास प्रशिक्षणार्थी डॉक्टर बेमुदत संपावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 5:39 PM
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मार्फत घेण्यात येणाऱ्या उन्हाळी सत्र २०२० परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याची मागणी स मेडिकल स्टूडंट वेल्फेअर असोसिएशन व वैद्यकीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना प्रमोट करण्याची मागणीमेडिकल स्टूडंट वेल्फेअर असोसिएशनचा इशारा