येवला : रूम टू रीड इंडिया ट्रस्ट व नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रप्रमुखांचे एकदिवसीय प्रशिक्षण पार पडले. अंगणगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील केंद्रप्रमुखांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड उपस्थित होते. सभापती गायकवाड, शिक्षणविस्तार अधिकारी सुनील मारवाडी यांनी मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे साधन व्यक्ती राम कुळकर्णी, पुंडलिक गवांदे व विशेष शिक्षक ज्ञानेश्वर कोकाटे यांनी विविध विषय व मुद्दे यांवर चर्चा घडवून आणली, तर उपस्थितांच्या प्रश्न व शंकेचे निरसन केले. यावेळी विविध प्रात्यक्षिकेदेखील दाखवण्यात आली.अंगणगाव केंद्रातील बदापूर, बाभूळगाव बुद्रुक, बाभूळगाव खुर्द, धानोरे, पारेगाव शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना ऑफलासन अध्यापनासाठी सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांना डिजिटल स्मार्ट पाटी डोनर डिवायस म्हणून पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी सुनील मारवाडी, केंद्रप्रमुख रमेश खैरनार, बाभूळगाव शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जानकर, दीपक कुर्हाडे, शांताराम लांडगे, पुंडलिक पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश खैरनार यांनी केले. आभार चंद्रकांत जानकर यांनी मानले. प्रशिक्षणास तालुक्यातील केंद्रप्रमुख व केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.