नांदूरशिंगोटेत जागतिक मृदादिनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:41 AM2020-12-07T00:41:54+5:302020-12-07T00:42:23+5:30
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व गोंदे परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जागतिक मृदादिनानिमित्त शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पार पडलेे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व गोंदे परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जागतिक मृदादिनानिमित्त शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पार पडलेे.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक मृदादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर युवा नेते उदय सांगळे, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच रामदास सानप, दीपक बर्के, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधनचे सतीश भोंडे, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष संजय आव्हाड, भारत दराडे, निवृत्ती शेळके, नानासाहेब शेळके, सुदाम भाबड आदींसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सर्व गावांची टप्प्याटप्प्याने निवड करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून जमिनीचा रासायनिक गुणधर्म, स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगाने देशभर राबविला जात आहे. याच अनुषंगाने तालुका कृषि अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदे, नांदूरशिंगोटे येथे सतीश भोंडे यांनी शेतकऱ्यांना कांदा पीक व्यवस्थापन आणि जमीन आरोग्य करिता सेंद्रिय खते, जैविक बुरशीनाशक, कीटकनाशक या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गोंदे येथे दशरथ तांबे यांच्या कांदा पिकास, नांदूर येथे संजय आव्हाड यांच्या कांदा प्रक्षेत्रास भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी संजय पाटील, महेश वेठेकर कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय साळुंके, कृषी सहायक कुसुम तांबे, वनिता शिंदे, दादासाहेब जोशी, अनिल दातीर यांनी परिश्रम घेतले.