माडसांगवी येथे शिक्षकांसाठी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:42 AM2018-03-31T00:42:37+5:302018-03-31T00:42:37+5:30
माडसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांसाठी ओढा बीटस्तरीय टप्पा-२ चे प्रशिक्षण शिबिर पार पडले. गणित संबोधन विकसन कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिरात पळसे व ओढा केंद्रांतर्गत येणाऱ्या एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, एकलहरे कॉलनी आदी ठिकाणच्या २४ शिक्षकांनी सहभाग घेतला.
एकलहरे : माडसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांसाठी ओढा बीटस्तरीय टप्पा-२ चे प्रशिक्षण शिबिर पार पडले.
गणित संबोधन विकसन कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिरात पळसे व ओढा केंद्रांतर्गत येणाऱ्या एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, एकलहरे कॉलनी आदी ठिकाणच्या २४ शिक्षकांनी सहभाग घेतला. ओढा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस चाललेल्या या शिबिरात तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर, डायटचे अधिव्याख्याता सोळुंके, शेवाळे, विस्तार अधिकारी श्रीमती देवकर आदींनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिबिरात गणित विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करून त्यावर प्रत्यक्ष विद्यार्थी, शिक्षक व मार्गदर्शक यांच्यात प्रात्यक्षिकांद्वारे चर्चा करण्यात आली. मार्गदर्शक पुस्तिकेत बेरीज-वजाबाकी यांना पर्यायी अनुक्रमे २२, ४० हा शब्दप्रयोग आहे, त्याचा वापर करून शाब्दिक उदाहरणे तयार करून त्यावर चर्चा करण्यात आली. या शिबिरात प्रतिभा गिते व जयश्री जगताप यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे संयोजन मुख्याध्यापिका शिंदे यांनी केले. शिक्षक सचिन कापडणीस यांनी आभार मानले.