‘त्या’ वीजवाहिनीचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:04 PM2019-10-09T23:04:00+5:302019-10-09T23:05:55+5:30
सटाणा/औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील धोकादायक उच्चदाबाच्या वीजवाहिनीचे महावितरणकडून अखेर स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांनीही अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, घेराव तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत’मध्ये या संबंधीचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन वीजवाहिनीचे स्थलांतर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

येथील यशवंतनगरजवळून उच्च दाबाची वीजवाहिनी गेल्याने तेथील नागरिकांना बांधकाम करता येत नव्हते. तसेच सदर वाहिनी जीवघेणी ठरत होती. ही वाहिनी गावाबाहेर स्थलांतरित करावी, याबाबत आठ वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या सदस्य शर्र्मिला गोसावी व नागरिकांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच अधिकारी खडबडून जागे झाले. वृत्ताची दखल घेत सदरची वीजवाहिनी स्थलांतरित केली. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेकांच्या घराच्या छतावरील विजेच्या तारांजवळून सदरची वाहिनी जात असल्याने रहिवाशांमध्ये घबराट होती. नेहमी भीतीच्या सावटाखाली राहावे लागत असे. यामुळे टेरेसवर कपडे वाळत घालताना मोठी कसरत करावी लागत असे. तसेच घराचा मजला बांधता येत नसल्याने गैरसोय होत होती.
याबाबत ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकारी व संबंधितांकडे वीजवाहिनी स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यासाठी निवेदन, अभियंत्यांना घेराव घातला होता. तरीही समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. येथील उच्चदाब वीजवाहिनीबाबत सुमारे आठ वर्षांपासून वीज कंपनीकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर नागरिकांसह महिलांनी अभियंत्यांना घेरावही घातला होता. मात्र दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत‘मध्ये वृत्त प्रकाशित होताच वाहिनी स्थलांतरित केल्यााने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
- शर्मिला गोसावी, सदस्य, ग्रामपंचायतवाहिनी घरांच्या छताला लागूनच होती. महिला व लहान मुले घराच्या छतावर गेल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ही वाहिनी हटविल्याशिवाय ग्रामस्थांना घराचे बांधकामही करता येत नव्हते. त्यामुळे सदरची वाहिनी स्थलांतरित करणे गरजेचे होते.
- नारायण अहिरे, ग्रामस्थ