पंचवटीत सापळा : कर्नाटकचे १२ टन आले अन‌् कोल्हापूरची १५ लाखांची मिर्ची लांबविणारे दोघे लबाड पोलिसांच्या जाळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:03 PM2021-06-20T16:03:12+5:302021-06-20T16:10:29+5:30

मिर्चीचे पोती दुसऱ्या टेम्पोमध्ये भरुन बनावट धनादेश लिहून देऊन देता पोबारा केला होता. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचीही उकल झाली

Trap in Panchavati: 12 tons of Karnataka came and two lakhs of Kolhapur chillies were caught by the police! | पंचवटीत सापळा : कर्नाटकचे १२ टन आले अन‌् कोल्हापूरची १५ लाखांची मिर्ची लांबविणारे दोघे लबाड पोलिसांच्या जाळ्यात !

पंचवटीत सापळा : कर्नाटकचे १२ टन आले अन‌् कोल्हापूरची १५ लाखांची मिर्ची लांबविणारे दोघे लबाड पोलिसांच्या जाळ्यात !

Next
ठळक मुद्देबनावट धनादेश अथवा किरकोळ रक्कम देत करत होते पोबाराशेतमाल घेऊन फरार होणारे दोघे गजाआडसहा लाखांचा मुद्देमाल जप्तबनावट धनादेशाद्वारे मिर्ची लुटल्याचीही कबुली

नाशिक : कर्नाटकच्या एका शेतमाल व्यापाऱ्याला जास्त बाजारभाव मिळवून देण्याचे आमीष दाखवून १२ टन आले परस्पर ट्रकमधून अन्य वाहनांमध्ये भरुन केवळ ट्रकभाडे आणि दैनंदिन खर्चाची रक्कम देत पोबारा करणाऱ्या तोतया शेतमाल व्यापाऱ्यांना अंबड पोलिसांनी पंचवटी येथील मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून शिताफीने बेड्या ठोकल्या.

कर्नाटक येथील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यापारी तौफिक फय्याज अहमद अन्सर (४०,रा. चिखमंगलुर, कर्नाटक) यांच्याकडे १२ टन आले (अद्रक) खरेदी करावयाचे आहे, असे सांगून व्यवहार केला. तौफिक हे ट्रकमध्ये सुमारे २५० पोती भरुन आले घेऊन नाशकात दाखल झाले असता शनिवारी (दि.१२) मोसिन व त्याच्या मित्रांनी मिळून संगनमताने त्यांच्या ट्रकमधून आल्याच्या सर्व पोती अन्य वाहनांमध्ये परस्पर भरुन घेत पोबारा केल्याची घटना घडली होती. तौफिक यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंबड पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुमार चौधरी, श्रीकांत निंबाळकर यांनी स्वतंत्र पथक तयार केले. पथकाने वडाळागावातील संशयिताच्या पत्त्यावर धडक दिली; मात्र पत्ता बनावट असल्याचे पुढे आले.
संशयितांनी ज्या मालवाहू वाहनातून आल्याची पोती लांबविली. त्या वाहनाच्या आरटीओ नोंदणी क्रमांकावरुन पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली. यावरुन चोरीचा आले खरेदी करणारा व्यापारी पोलिसांच्या हाती लागला. त्यास विश्वासात घेत संशयितांकडून काही रक्कम घ्यावयाची असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

...असे अडकले जाळ्यात
आले खरेदी करणाऱ्या दुसऱ्या व्यापाऱ्याला उरलेली रक्कम परत देण्यासाठी पंचवटी येथील मार्केट यार्डात संशयित मोहसीन अकील शेख (२९,रा.शिवाजीनगर, सातपुर), व अबरार महेबुब बागवान (२७,रा. बागवानपुरा, जुने नाशिक) हे दोघे कारमधून आले. पथकाला खात्री पटताच तपासी अधिकारी राकेश शेवाळे, रवी पानसरे, चंद्रकांत गवळी, हेमंत आहेर आदीनी शिताफीने या दोघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्या ताब्यातुन दोन मोटारी व दोन लाख २० हजार रुपयांची रोकड असा सुमारे ६ लाख वीस हजार रुपयांचा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
 

Web Title: Trap in Panchavati: 12 tons of Karnataka came and two lakhs of Kolhapur chillies were caught by the police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.