सिन्नर : शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने गंभीर रुग्णांना लवकरात-लवकर उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी स्टेप डाउन प्रोसेस सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नुकतीच इंडिया बुल्सचे कोविड केअर सेंटर, सिन्नर उपजिल्हा रुग्णालय, विंचूरदळवी येथील विलगीकरण कक्ष आदी ठिकाणी भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालयात ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत नाही त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करा, कोविड केअर सेंटरमध्ये बऱ्या झालेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये पाठवा. अशी स्टेप डाउन प्रोसेस सुरू केल्यास गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंडे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत खैरनार, उपमुख्याधिकारी रोहित पगार, आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, सुशील पगार आदी सहभागी झाले होते.
--------------
दंडात्मक कारवाई वाढवा
उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी कक्ष आणि इतर कामांसाठी एकाच प्रवेशद्वारातून प्रवेश देण्याऐवजी मागच्या प्रवेशद्वाराने एक कक्ष सुरू करण्याच्या सूचना त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांना दिल्या. टेस्टिंग वाढविण्याबरोबरच कंटेन्मेंट झोन स्ट्रॉँग करा, विनामास्क आणि इतर दंडात्मक कारवाया वाढवा, होम आयसोलेशन रुग्णांचे प्रॉपर मॉनिटरिंग करा, महसूल, पोलीस आणि पंचायत समिती प्रशासनाने त्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना बनसोड यांनी दिल्या.
----------------
सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना लीना बनसोड. समवेत डॉ. वर्षा लहाडे, राहुल कोताडे, मधुकर मुरकुटे, मोहन बच्छाव, लहू पाटील, संतोष मुटकुळे, प्रशांत खैरनार आदी. (०५ सिन्नर १)
===Photopath===
050421\05nsk_14_05042021_13.jpg
===Caption===
०५ सिन्नर १