मैत्रीय दिनाचे औचित्य साधून केले अंकाई-टंकाई किल्यावर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 06:09 PM2020-08-02T18:09:26+5:302020-08-02T18:09:26+5:30
नगरसुल : मैत्रीय दिनाचे औचित्य साधून तरु णांनी अंकाई-टंकाई किल्यावर वृक्षरोपण केले.
नगरसुल : मैत्रीय दिनाचे औचित्य साधून तरु णांनी अंकाई-टंकाई किल्यावर वृक्षरोपण केले.
येवला तालुक्यातील अंकाई-टंकाई किल्यावर मैत्र्याय दिनानिमित्त वृक्षारोपण स्वराज्य इतिहासाच्या पाऊल खुणा परिवार व सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था, पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२) अंकाई-टंकाई किल्ल्यावरती मैत्री दिवसाचे औचित्य साधून वृक्षाशी मैत्री करत १०० जंगली वृक्षांची लागवड करण्यात आली. पायथ्यापासून सुरु वात करत भवानीमाता मंदिरापर्यंत परिसरात ७५ व तेथून किल्ला दरवाजा एक पर्यंत २५ वृक्षांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी कैलास दुगड, विशाल जाधव, दीपक देशमुख, मच्छिंद्र काळे, महेश शेटे, अनिल निकम, मुकुंद अहिरे, संतोष पर्देशी, अजय शिंदे, सत्यनारायण दीक्षित, प्रवीण सानप, दीपक दुगड, सागर दुगड आदी उपस्थित होते.