आदिवासी जनतेला सरकारी बाबूंकडूनच कोरोनाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 06:55 PM2020-07-05T18:55:10+5:302020-07-05T18:58:02+5:30

सुरगाणा : जिल्ह्यात अद्यापही कोरोना मुक्त राहिलेल्या सुरगाणा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे मुख्यालयी न रहाता अप डाऊन करत असल्याने तालुकावासियांसाठी काळजीचे कारण बनले असून या सर्वांना मुख्यालयीच रहावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे येथील तहसिलदार व जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.

Tribal people fear corona from government babus | आदिवासी जनतेला सरकारी बाबूंकडूनच कोरोनाची भीती

सुरगाणा येथील नायब तहसिलदार बकरे व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांचेकडे निवेदन सादर करतांना चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे समवेत कार्यकर्ते.

googlenewsNext
ठळक मुद्देसुरगाणा : मुख्यालयी राहण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी

सुरगाणा : जिल्ह्यात अद्यापही कोरोना मुक्त राहिलेल्या सुरगाणा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे मुख्यालयी न रहाता अप डाऊन करत असल्याने तालुकावासियांसाठी काळजीचे कारण बनले असून या सर्वांना मुख्यालयीच रहावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे येथील तहसिलदार व जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सुरगाणा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. शासनाने निर्धारित केलेल्या लॉकडाउनची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आज पर्यंत तालुका कोरोनामुक्त राखण्यात यश आले आहे. तालुक्यातील बरेचसे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत ते नाशिक, मालेगांव, सिन्नर, चांदवड, येवला तसेच कोरोनाग्रस्त भागातून ये- जा करीत आहेत. यामध्ये महसूल विभाग, तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोस्ट कार्यालय, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र आदी कार्यालयातील अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी मुख्यालय न राहता ये जा करीत आहेत. या सरकारी बाबूनां मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जावी. जे मुख्यालयी राहत नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता, घरभाडे भत्ता, प्रोत्साहनपर दिला जाणारा भत्ता या सवलती बंद करण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर आदिवासी सेवक चिंतामण गावित, शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, गोपाळराव धुम, भिका राऊत, पांडुरंग गायकवाड, आनंदा झिरवाळ, हरिभाऊ भोये, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल भोये, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित, नगरसेवक रमेश थोरात आदिंच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, तहसिलदार विजय सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना देण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Tribal people fear corona from government babus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.