बागलाण तालुक्यातील आदिवासींना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:46 AM2017-11-29T00:46:49+5:302017-11-29T00:46:49+5:30

बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटातील मानूर येथील शंभरहून अधिक आदिवासींना घरकुल मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका पंचायत समिती सदस्यासह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचाने हजारो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्याकडे तक्र ार करून एक महिना उलटला तरीदेखील कोणतीही कारवाई न झाल्याने यंत्रणा संशयाच्या भोवºयात सापडली आहे.

 To the tribals of Baglan taluka, they have been provided | बागलाण तालुक्यातील आदिवासींना घातला गंडा

बागलाण तालुक्यातील आदिवासींना घातला गंडा

googlenewsNext

सटाणा : बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटातील मानूर येथील शंभरहून अधिक आदिवासींना घरकुल मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका पंचायत समिती सदस्यासह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचाने हजारो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्याकडे तक्र ार करून एक महिना उलटला तरीदेखील कोणतीही कारवाई न झाल्याने यंत्रणा संशयाच्या भोवºयात सापडली आहे.  शासनाने आदिवासी दुर्गम भागात राहणाºया आदिवासी बांधवांच्या निवाºयासाठी विविध योजनांमधून घरकुल बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र पुढारी आणि अधिकारी या जोडगोळीला टक्केवारीची कीड लागल्यामुळे अशा योजनांचा फज्जा उडून अजूनही एकवेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या हजारो गरीब आदिवासींना बेघर राहवे लागत आहे. असाच काहीसा प्रकार बागलाण तालुक्यातील मानूर येथील आदिवासी बांधवांना अनुभवयास मिळत आहे.याबाबत मानूरच्या बारा पाड्यातील शंभरहून अधिक आदिवासींनी थेट जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्याकडे एका निवेदनाद्वारे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला.मानूर येथील पंचायत समतिी सदस्य ,ग्रामसेवक ,सरपंच ,उपसरपंच हेहुकुमशाही पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहात असून अक्षरश: कागदोपत्रीच ग्रामसभा व मासिक सभा घेऊन मनमानी करून सोयीस्करपणे ठराव तयार केले जात असल्याचा गंभीर आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.उभय पुढार्यांची चौकडी पंतप्रधान आवास योजना ,शबरी घरकुल योजना आदी योजनांमधील मंजूर लाभार्थ्यांची यादी स्वत: जवळ ठेऊन घरकुल हव असेल तर साहेबांना पैसे द्यावे लागतील अन्यथा मंजूर होणार नसल्याचे सांगितले जाते.याप्रकाराबाबत संजय राजाराम गवळी ,रामदास गणसू गावित ,गंगाराम सोनजी गायकवाड ,धनाजी गावित ,काळू पवार ,कैलास गायकवाड ,किसन गांगुर्डे आदी ग्रामस्थांनी येथील गटविकास अधिकारी यांच्याना अनेक वेळा भेटून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला मात्र न्याय मिळाला नाही म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मीना यांच्याकडे तक्र ार केली परंतु एक मिहना उलटूनही अद्याप दखल न घेतल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
घरकुलसाठी पैशांसोबत कोंबडाही....
दिवसभर काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरणार्या आदिवासींच्या टाळूवरची लोणी खाणार्या पुढारी आण िअधिकार्यांनी भ्रष्टाचाराची सीमाच पार केली.पठावे दिगर गटातील पंचायत समतिी सदस्याने चक्क शिवाजी मन्साराम ठाकरे या मोलमजुरी करणार्या गरीब आदिवासीकडून घरकुल मंजूर करण्यासाठी चक्क रोख तीन हजार रु पयांबरोबरच दीड पावणेदोन किलोचा कोंबडा घेतल्याचे तक्र ारीत म्हटले आहे.या भ्रष्ट चौकडीने मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहून पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल हव असल्यास त्या लाभार्थ्याला बोलावून दोन हजार दिल्यास तत्काळ मंजूर करण्याचे आमिष दाखिवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.तसेच शबरी घरकुल योजनेचा लाभ हवा असल्यास लाभार्थ्याच्या ऐपतीप्रमाणे दहा ते तीस हजार रु पयांपर्यंत पैसे घेऊन लुबाडल्याचे तक्र ारीत म्हटले आहे. 

Web Title:  To the tribals of Baglan taluka, they have been provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.