इंदिरानगर परिसरात कृ त्रिम पाणीटंचाई

By admin | Published: April 21, 2017 01:23 AM2017-04-21T01:23:58+5:302017-04-21T01:24:10+5:30

इंदिरानगर : महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Trim water shortage in Indiranagar area | इंदिरानगर परिसरात कृ त्रिम पाणीटंचाई

इंदिरानगर परिसरात कृ त्रिम पाणीटंचाई

Next

इंदिरानगर : महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या त्रस्त नागरिकांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदण्याचा सपाटा लावला असल्याचे दिसून येत आहे.
पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुरळीत होत नसल्याने नागरिकांना कूपनलिकेच्या माध्यमातून हजारो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
गतवर्षी गंगापूर धरणात अत्यंत कमी जलसाठा असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होता. यंदा धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाचे नियोजन बिघडल्याने परिसरात कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Trim water shortage in Indiranagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.