त्र्यंबकनाका-अशोकस्तंभ; उद्यापासून एकेरी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:56 AM2018-10-22T01:56:08+5:302018-10-22T01:56:24+5:30
स्मार्ट सिटी अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड करण्यात येत असून, प्रथम अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंतच्या मार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते़ त्यामुळे या रस्त्याचे काम होईपर्यंत त्र्यंबकनाका सिग्नल बाजूकडून अशोकस्तंभाकडे एकेरी वाहतुकीत बदल करण्यात आला असून, या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मंगळवार (दि़२३) व बुधवार (दि़२४) असे दोन दिवस सकाळी ८ वाजेपासून प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढली आहे़
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड करण्यात येत असून, प्रथम अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंतच्या मार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते़ त्यामुळे या रस्त्याचे काम होईपर्यंत त्र्यंबकनाका सिग्नल बाजूकडून अशोकस्तंभाकडे एकेरी वाहतुकीत बदल करण्यात आला असून, या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मंगळवार (दि़२३) व बुधवार (दि़२४) असे दोन दिवस सकाळी ८ वाजेपासून प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढली आहे़
पर्यायी मार्ग
अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या मार्गाचे नूतनीकरण होणार असल्याने पंचवटीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सीबीएस- त्र्यंबकनाका-सातपूरकडे जायचे असल्यास त्यांनी रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - शालिमार - शिवाजीरोड - सीबीएस असे मार्गस्थ होतील़ तसेच त्र्यंबकनाक्याकडे जायचे असल्यास शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषदमार्गे त्र्यंबकनाका मार्गस्थ होतील़
४गंगापूररोडकडून- रामवाडी पुलाकडून येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना मेहेर सिग्नल-सीबीएस-त्र्यंबकनाकाकडे जायचे असल्यास त्यांनी १़ अशोकस्तंभ - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - मेहेर सिग्नल़ २़ अशोकस्तंभ - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस़ ३़अशोकस्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल - शालिमार-खडकाळी सिग्नल - जिल्हा परिषद-त्र्यंबकनाका-सातपूर असे मार्गस्थ व्हावे किंवा गंगापूर नाका-कॅनडा कॉर्नर-टिळकवाडीमार्गे सीबीएस असे मार्गस्थ व्हावे़
४मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मुंबईनाका - वडाळानाका-द्वारका-आडगाव नाका-काट्या मारुती - निर्माणी या मार्गाचा अवलंब करावा़
४सिडको व सातपूरकडून पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मायको सर्कल - जुना सीटीबी सिग्नल - एचडीएफसी सर्कल - कॅनडा कॉर्नर - जुना गंगापूर नाका - रामवाडी किंवा ड्रिम कॅसलमार्गे पंचवटीकडे मार्गस्थ व्हावे़
४स्मार्ट रोडचे काम सुरू असल्याने त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ व त्र्यंबकनाका ते किटकॅट कॉर्नर परिसरात नो हॉल्टिंग, नो पार्किंग झोन कार्यरत करण्यात आले आहेत़ मंगळवारी (दि़२३) सकाळी ८ वाजेपासून या अधिसूचनेची अंमलबजावणी केली जाणार आहे़ या अधिसूचनेचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे़