नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकांसाठी रविवारी (दि. १०) अनुक्रमे ८४.८५ आणि ६८.५३ टक्के मतदान झाले. मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. ११) मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मतदानासाठी रविवारी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्र्यंबकला तर मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे मतदानाची टक्केवारी तब्बल ८५ टक्क्यापर्यंत पोहोचली. त्र्यंबकला नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात होते. इगतपुरीमध्येही काहीशी अशीच स्थिती होती. नगरपालिकेच्या नऊ प्रभागांतून प्रत्येकी दोन असे एकूण १८ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात भाग्य आजमावीत आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेकडूनही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्र्यंबक ला ८५, इगतपुरीत ६८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:14 AM
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकांसाठी रविवारी (दि. १०) अनुक्रमे ८४.८५ आणि ६८.५३ टक्के मतदान झाले. मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. ११) मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
ठळक मुद्देनगरपालिका निवडणूक : मतदारात उत्साहशहरातील एका मतदान केंद्रावर महिलांची लागलेली रांग