त्र्यंबकला कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:30 PM2021-03-15T18:30:35+5:302021-03-15T18:32:03+5:30
त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शनिवारी व रविवारी हे आठवड्यातील दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला.
त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शनिवारी व रविवारी हे आठवड्यातील दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला.
त्र्यंबकेश्वर शहरात महाशिवरात्रीपासून दि.११ ते १४ मार्च हे चार दिवस बंद पाळण्याचे आवाहन केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. पुढील आदेश होईपर्यंत दर शनिवार व रविवारी दोन दिवस बंद पाळण्यात येणार आहे. राज्यात आघाडी सरकार आल्यापासून शनिवार व रविवार या सलग सुट्या जाहीर करून पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असल्याने दोन दिवस त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक होती. यासाठी शनिवार व रविवारी बंदचा निर्णय घेऊन प्रशासनाने वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.