गडावर जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरला कावडीधारकांची लगबग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:13 PM2018-10-22T13:13:57+5:302018-10-22T13:14:05+5:30
त्र्यंबकेश्वर : नांदुरी येथील सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरहुन येथुन कुशावर्त तिर्थातील जल घेउन सप्तशृंगी मातेला चढविण्यासाठी कावडीधारकांची लगबग सध्या सुरु आहे.
त्र्यंबकेश्वर : नांदुरी येथील सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरहुन येथुन कुशावर्त तिर्थातील जल घेउन सप्तशृंगी मातेला चढविण्यासाठी कावडीधारकांची लगबग सध्या सुरु आहे. कोजागिरी पौर्णिमेला हे जल चढविण्यात येते. साधारण दोन तीन दिवस अगोदर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून कावडीधारक निघतात. दसरा आटोपताच ञ्यंबकेश्वर येथून हजारो कावडधारक सप्तशृंगगडाकडे रवाना होत आहेत. पुर्व परंपरेनुसार कोजागिरी पौणर्मिेस तिर्थराज कुशावर्ताचे जल आई जगंदबा सप्तशृंगी मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी खांद्यावर कावड घेऊन पायी चालत भाविक दोन दिवसात साधारणपणे १२० कि.मी.चा हा प्रवास पायी चालत पुर्ण करत असतात. पुर्वी केवळ स्थानिक नागरिक कावड घेउन जात असत. त्यात हल्ली बाहेरगावच्या भाविकांची कावड घेउन जाणा-या कावड धारकांची वाढ झाली आहे. दस-याचे सोने वाटप झाले की, तेव्हापासूनच कावडधारकांची लगबग सुरु होते. तिर्थराज कुशावर्त चौकात नारळ आणि कावड सजावटीचे साहित्य विक्र ीची दुकाने थाटलेली आहेत. भगवी वस्त्र त्यातही प्रिंटेड टी शर्ट आदींची मागणी वाढली आहे. तांब्या (कावड) बांधणे ही देखील विशिष्ट पध्दतीने बांधली जाते. अशा कावडी बांधणे सजावट करणे. हार वगैरे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त चौकात मोठी गर्दी असते. कालानुरु प यात झालेले बदल स्पष्ट जाणवत असून खांद्यावरच्या कावडला पर्याय म्हणून हातात कलश घेऊन जाणारे अधिक आहेत. गत काही वर्षात महिला भाविकांची संख्या वाढली आहे.