त्र्यंबकेश्वर भाविकांनी गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 01:11 AM2019-08-13T01:11:47+5:302019-08-13T01:13:14+5:30
त्र्यंबकेश्वर : दुसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर शहर भाविकांच्या गर्दीने गजबजले. यावेळी त्र्यंबकराजाच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेत दर्शन घेतले.
त्र्यंबकेश्वर : दुसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर शहर भाविकांच्या गर्दीने गजबजले. यावेळी त्र्यंबकराजाच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेत दर्शन घेतले.
येथील त्र्यंबकराजाच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. याशिवाय, ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठीही गर्दी झाली होती. अनेकजण दिंड्या घेऊन तर काही मंडळांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. प्रदक्षिणामार्गावर चहा, फराळाचे स्टॉल लागलेले होते. काही ठिकाणी सेवाभावी मंडळांमार्फत मोफत चहा-फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. अधून-मधून कोसळणाºया पावसाच्या सरी झेलत पर्यटनाचाही आनंद लुटला जात होता. येत्या १९ आॅगस्टला तिसरा श्रावण सोमवार आहे. त्या पार्श्वभूमीवरही प्रशासनामार्फत तयारी केली जात आहे. यावर्षी त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यात जोरदार पाऊस बरसल्याने परिसर निसर्गसौंदर्याने नटला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील हिरवाई पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यातच श्रावणी सोमवारमुळे दर्शनासह पर्यटनाचाही आनंद लुटला.
जात असल्याने बाहेरगावहून येणाºया भाविकांचीही गर्दी वाढत आहे. हरिगिरी महाराजांना रोखलेत्र्यंबकेश्वर येथील जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्रीमहंत हरीगिरीजी महाराज सोमवारी (दि.१२) पहाटे कुशावर्त तीर्थावर स्नान करत ओल्या वस्त्रानिशी भगवान त्र्यंबकेश्वर मंदिरात त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी गेले. मात्र, पोलीस यंत्रणा व देवस्थान कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. यावेळी वादविवादही झाला. यासंदर्भात हरिगिरी महाराज यांनीच पत्रकारांशी बोलताना नापसंती व्यक्त केली.