त्र्यंबकेश्वर तालुका शून्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:00 PM2020-12-01T23:00:59+5:302020-12-01T23:57:53+5:30
त्र्यंबकेश्वर : कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असताना आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मात्र केवळ सात स्वॅब प्रलंबित असून, शहरासह कोरोनामुक्तच दिसून येत आहे.
Next
ठळक मुद्देकेवळ सात स्वॅब प्रलंबित
त्र्यंबकेश्वर : कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असताना आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मात्र केवळ सात स्वॅब प्रलंबित असून, शहरासह कोरोनामुक्तच दिसून येत आहे.
आतापर्यंत ४९७ रुग्ण पॉझिटिव्ह होते. त्यात त्र्यंबकेश्वर जिल्हा परिषद हद्दीतील ३४१ रुग्ण होते, तर त्र्यंबकेश्वर नगर परिषद हद्दीतील १६८ रुग्ण होते. यापैकी कोरोनाने तालुक्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बरे होऊन ४५४ लोक घरी गेले आहेत. आजमितीला कोव्हीड केअर सेंटरमध्ये, डेडीकेटेड हेल्थ सेंटर तर डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटलमध्ये तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये व आयसोलेटेड होम क्वॉरण्टाइन एकही पेशंट नाही.