येवला : रस्त्यावर चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचा बॅक लाइट नसल्याने गेल्या आठवड्यात एक अपघात झाला त्यात तालुक्यातील एका शेतकरी नेत्याला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. अशी वेळ पुन्हा कुणावर येऊ नये यासाठी, अपघात टाळण्याच्या उपायाचा एक भाग म्हणून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीने समितीच्या आवारात कांदा विक्र ीसाठी घेवून येणाऱ्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या बाजूला रेडियमच्या त्रिकोणी पट्ट्या मोफत लावण्याचा उपक्र म हाती घेतला आहे. या निमित्ताने झालेल्या छोटेखानी कार्यक्र माचे अध्यक्ष मनमाड पोलीस उपअधीक्षक डॉ राहुल खाडे होते. व्यासपीठावर तालुका पोलीस निरीक्षक रु पचंद वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील, नंदकुमार अट्टल,नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, कांतीलाल साळवे, सुदाम सोनवणे, बाळू गायकवाड, भागुनाथ उशीर, अशोक शहा, अनिल मुथा, नारायण गायकवाड, भास्कर येवले, धोंडीराम कदम,एकनाथ साताळकर,रमेश शिंदे, रावसाहेब खैरनार,अशोक सदगीर, रीजवान शेख उपस्थित होते. प्रारंभी सेनेचे नेते दिवंगत सूर्यभान जगताप, मच्छिंद्र वरे, प्रभावती आहेर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रस्ताविक जेष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी केले. शिवसेनानेते संभाजी पवार, जिल्हा बँक संचालक किशोर दराडे, शेतकरी संघटना नेते संतू पाटील झांबरे, मकरंद सोनवणे, साहेबराव सैद, सुभाष समदडीया, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिव डी.सी.खैरनार यांनी केले. कार्यक्र माच्या नियोजनासाठी बंडू आहेर, कैलास व्यापारे, संजय ठोक, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
येवला बाजार समितीतर्फे ट्रॉलींना रिफ्लेक्टर
By admin | Published: March 11, 2017 1:22 AM