लासलगाव : नाशिकहुन औरंगाबाद कडे निघालेली बस (एम एच ०६ एस ८३९६) मध्ये सोमवारी सकाळी निफाडपावेतो प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचालकाच्या मुजोपणाचा चांगलाच त्रास सहन करावा लागला. याबाबत निफाड बस स्थानकात प्रवाशांनी तक्र ार नोंदविली आहे.याबाबतची माहिती अशी कि नाशिक येथुन सोमवारी सकाळी सव्वादहा वाजेदरम्यान निघालेली नाशिक-औरंगाबाद हि बस प्रवाशांना घेऊन निघाली यात काही जेष्ठ नागरिक तर काही युवक तसेच महिलाही प्रवास करत होत्या बसचालकाने चांदोरीच्या पुढे बसचा वेग वाढवत नेला मात्र वाढलेल्या वेगात पिंपळस गावाजवळील गतिरोधकावर बस जोरात आदळल्याने बसमधील जेष्ठ नागरिक सिटावरु न उंच उडाले व सिटवर पडले.याबाबत पिंपळसला बसचे वाहक व चालक यांना काही प्रवाशांनी वेगवान चालवु नका मागे बसलेल्यांना त्रास होत आहे असे सांगितले. त्यावर बसचालकाने जाणीवपुर्वक बसचा वेग अगदीच कासवगतीने करत करत बस निफाड बसस्थानकात आणली.याबाबत उतरलेल्या प्रवाशांनी विचारणा केली असता बसचालक व वाहकाने प्रवाशांची टिंगल करत तक्र ार पुस्तिका उपलब्ध नसल्याचे सांगीतले. अखेरीस प्रवाशांच्या वतीने बस स्थानकातिल वाहतुक नियंत्रण कक्षात जाऊन तक्र ार पुस्तिकेत बसचालकाच्या या कृत्याबाबत तक्र ार नोंदविली आहे.एककीकडे प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद घेऊन परिवहन विभाग जाहिरात करत असते मात्र बसलेल्या प्रवाशांना वाहनाचा वेग कमी जास्त करु न त्रास देणाºया चालक वाहकामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने परिवहन सेवेच्या तक्र ारीत वाढ होत आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
बसचालकाच्या मुजोपणाचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 7:04 PM
लासलगाव : नाशिकहुन औरंगाबाद कडे निघालेली बस (एम एच ०६ एस ८३९६) मध्ये सोमवारी सकाळी निफाडपावेतो प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचालकाच्या मुजोपणाचा चांगलाच त्रास सहन करावा लागला. याबाबत निफाड बस स्थानकात प्रवाशांनी तक्र ार नोंदविली आहे.
ठळक मुद्देनिफाड बस स्थानकात प्रवाशांनी नोंदविली तक्र ार