ट्रकची दुचाकीला धडक; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:17 AM2021-01-07T01:17:00+5:302021-01-07T01:17:21+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावर सायने शिवारात हॉटेल अंबिका समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले. याप्रकरणी तालुका पोलिसात टाटा ट्रक क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर सायने शिवारात हॉटेल अंबिका समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले. याप्रकरणी तालुका पोलिसात टाटा ट्रक क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहंमद नईम मोहंमद सिद्दीकी (४७) रा. स. नं. १५, कमालपुरा यांनी
तालुका पोलिसात फिर्याद दिली. ४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४) वरील चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकी क्रमांक एमएच ४१ एई ०५५२ ला धडक दिली. यात दुचाकीस्वार जुनेद नईम अहमद (२१) व त्याचा साथीदार समसुलहुदा मोहंमद आवान शहा (४५) रा. आझादनगर, धुळे हे दोघे गंभीर जखमी होऊन ठार झाले.
दुकानात चोरी
मालेगाव : शहरातील हारुण अन्सारी नगरातील ग. नं. २ मध्ये रात्री १० वाजेच्या सुमारास दुकानात जाऊन पैशांची मागणी करीत दमदाटी करून गल्ल्यातील रोकड चोरून नेल्याप्रकरणी शेख उमर शेख फारूख, रा. दातारनगर याच्या विरोधात पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली. अल्ताफ अहमद मुश्ताक अहमद, रा. हारुण अन्सारी नगर, ग. नं. २ यांनी फिर्याद दिली. फिर्यादीच्या
दुकानात आरोपी उमर शेख याने कटर दाखवून पैशांची मागणी केली. दमदाटी करून गल्ल्यातील १ हजार २०० रुपयांची रोकड घेऊन पळून गेला. शिवीगाळ, दमदाटी करून दुकानाचे नुकसान केले. अधिक तपास उपनिरीक्षक उगले करीत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हाजी अहमदपुरा भागातून दुचाकीची चोरी
मालेगाव : शहरातील हाजी अहमदपुरा भागातील घरासमोर लावलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएल ५८३४ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. १ जानेवारी राेजी पहाटे १ ते सकाळी पावणेआठ वाजेदरम्यान ही चोरी झाली. मोहंमद अर्शद अतहर हुसेन (२८) रा. प्लॉट नं. २५, हाजी अहमदपुरा यांनी रमजानपुरा पोलीसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रोही करीत आहेत.