तुकाराम मुंढे यांची ‘तणाव व्यवस्थापन कार्यशाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:06 AM2018-08-15T01:06:34+5:302018-08-15T01:08:07+5:30
महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या देखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
नाशिक : महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या देखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. फेबु्रवारी महिन्यात नाशिकमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आगमन झाल्यापासून कामाचा ताण त्यांच्या कारकिर्दीत वाढला, असा आरोप करण्यात येत आहे. वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते, त्याचप्रमाणे महापालिकेच्या अॅपवर तक्रारी केल्यानंतरही तातडीने त्याचे निराकरण करावे लागते अन्यथा टांगती तलवार असते, असेही सांगितले जाते. नोटिसांचा मारा सहन करावा लागतो अशीही तक्रार असून, त्याचपार्श्वभूमीवर अलीकडेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली आहेत. कामाच्या ताणामुळे नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील हे बेपत्ता झाले होते, तर सहायक अधीक्षक संजय दादा धारणकर याने आत्महत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक ताणला गेला असून, महापालिकेत मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेने नोटिसा बजावल्याने हा विषय अधिक अडचणीचा ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत कोणाला ताण टळावा का? असा प्रश्न करून आपल्यामुळे ताणतणाव असेल तर थेट मला सांगा असे सांगितल्याचे वृत्त आहे. मात्र अधिकाºयांनी उत्तर दिले नसल्याचे समजते. त्याचप्रमाणे कर्मचाºयांच्या बैठका घेऊन त्यांनादेखील कामाचा किती ताणतणाव आहे याबाबत चौकशी करण्यास सांगितले आहे.