नाशिक - पुरणपोळी, मांडा, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, नान, लाच्छा पराठा अशा खास महाराष्ट्रीयन आणि चॉकलेट, कोकोनट, ब्राऊन, स्पायरल, पिझ्झा या ब्रेड सोबतच स्वाडीश सिनामन बन्स, सिनॅमन रोल, फ्रेंच ब्रिओश, टुटी- फु्रटी, हॉट डॉग या फे्रंच आणि इटालियनपासून साऊथ इंडियनच्या तब्बल ११८ प्रकारातील ब्रेडच्या प्रकारांनी नाशिककर खवय्यांचे लक्ष वेधले़ जागतिक ब्रेड दिनानिमित्त आयोजित ब्रेड प्रदर्शनात कुकरी आणि बेकरी प्रकार सादर करण्यात आले़ महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पंचवटी येथील हॉटेल व केटरींग टेक्नॉलॉजी महाविद्यालयात ब्रेड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते़ कुकरी आणि बेकरीच्या विद्यार्थ्यांकडून मागील आठ वर्षांपासून ब्रेड प्रदर्शन भरविण्यात येत आहे़ प्रदर्शनाची व्यवस्था आणि ब्रेडचे सर्व प्रकार विद्यार्थी तयार करतात़ त्यात भारतीय, साऊथ इंडियन, फें्रच, इटालियन, स्वाडीश, वेस्टर्न अशा विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला होता़ यावेळी विद्यार्थी व खवय्यांना हे अनोखे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाली़ प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती़कासव ब्रेडयावेळी विद्यार्थ्यांनी मीठाच्या पिठापासून आकर्षक घड्याळे, टोकरी, बास्केट, फुलांचे प्रकार आणि कासवाची प्रतिकृती तयार केली होती़ प्रदर्शनात या वस्तूंचे सर्वाधिक आकर्षण होते़