नाशिक जिल्ह्यात बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:13+5:302021-05-11T04:16:13+5:30
सोमावरी सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव ...
सोमावरी सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर जाणवला. पॉझिटिव्हिटी रेटदेखील चाळीस टक्क्यांवर गेला होता. आता तो २६ ते २८ टक्क्यांवर आला असला तरी रुग्णांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. राज्य शासनाने ५ एप्रिलपासून निर्बंध लागू केले. त्यानंतर २२ एप्रिलपासून पुन्हा कडक निर्बंध लागू केले. परंतु रस्त्यावरील गर्दी मात्र कायम आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून १२ तारखेला दुपारी १२ वाजेपासून ते २३ तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
कोट..
दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी जवळपास ही शेवटची संधी आहे. एकीकडे गर्दीला नियंत्रित करताना जनजीवनावर कमीत कमी परिणाम होईल अशी रचना करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले तर भविष्यात अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
(मांढरे यांचा फोटो वापरावा)