इंजेक्शनचा काळाबाजार करणारे दोघे ताब्यात, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:56 AM2021-05-06T06:56:57+5:302021-05-06T07:03:07+5:30

'टोसिलुझुमॅब' हस्तगत : एक बाटलीसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

Two black marketeers of injections seized, Rs 4 lakh seized | इंजेक्शनचा काळाबाजार करणारे दोघे ताब्यात, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

इंजेक्शनचा काळाबाजार करणारे दोघे ताब्यात, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देअत्यावश्यक गटात मोडणारी औषधे चढ्या दराने काळ्याबाजारात विक्री करताना वारंवार आढळून येत आहे. असाच काहीसा प्रकार बुधवारी (दि.5) गंगापूर रोडवर उघडकीस आला

नाशिक : कोरोना आजारात उपचारासाठी वापरले जाणारे अत्यावश्यक गटात समाविष्ट असलेल्या औषधांपैकी एक 'टोसिलुझुमॅब' या इंजेक्शनचा काळाबाजार करताना गंगापूररोड परिसरात दोघाना गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून एक इंजेक्शनची बाटली जप्त करण्यात आली आहे.

अत्यावश्यक गटात मोडणारी औषधे चढ्या दराने काळ्याबाजारात विक्री करताना वारंवार आढळून येत आहे. असाच काहीसा प्रकार बुधवारी (दि.5) गंगापूर रोडवर उघडकीस आला. या ठिकाणी एका रुग्णालयाच्या बाहेर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यासाठी काही संशयित येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाला मिळाली. पथकाने अन्न औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी सापळा रचला. बनावट ग्राहक तयार करुन संशयितांसोबत संपर्क करत ठरलेल्या ठिकाणी बोलविण्यात आले. तेथे एका स्विफ्ट कारमधून ( एम एच15 एफ एन5055) संशयित प्रणव केशव शिंदे (२४, लक्ष्मणरेखा सोसायटी, पंचवटी), संकेत अशोक सावंत (२५, रा.न्यू तेजश्री अपार्टमेंट, मखमलाबाद नाका, पंचवटी) हे आले. यावेळी बनावट ग्राहकाने मागणी करत इंजेक्शन ताब्यात घेतले असता अन्न औषध प्रशासनासाच्या निरीक्षकांनी कारमध्ये बसलेल्या तरुणांना औषधविक्रीचा परवाना मागितला असता त्यांनी नकार दिला. यावेळी पोलिसांनी कारला घेराव घालत चौघांना ताब्यात घेतले.

दरम्यान, प्रणवच्या अंगझडतीत 40 हजार 600 रुपये किंमतीचे एक इंजेक्शन पोलिसांना मिळाले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 3 लाखांची मोटार, आठ हजारांची रोख रक्कम, महागडे मोबाईल असा सुमारे 4 लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. औषध निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख (४५) यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. याप्रकरणी त्यांचे दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Two black marketeers of injections seized, Rs 4 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.