इगतपुरी : शहरात घरफोडी करणाऱ्या दोन चोरांना जेरबंद करण्यात आले आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात इगतपुरी शहरातील रहिवासी हरी गुलाब वीर, राहणार सहा बंगला, आठ चाळ, हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असता, त्यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एक सॅमसंग (एलईडी) टिव्ही, ०२ गॅस सिलेंडर, १ पाण्याची मोटर असा एकूण १,५५,००० रूपयांचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता,
या घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे तपासात आरोपींचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हेशाचे पथकास मिळालेल्या माहितीवरून शहरातील संशयीत आरोपी राहुल बाळासाहेब घेगडमल, राहणार आटचाळ, इगतपुरी,व रोहीत अशोक बागुल, आटचाळ, इगतपुरी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी फेब्रुवारी महिन्यात इगतपुरी शहरातील आठचाळ परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची कबुली दिली.
संशयित आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, पोलिसी उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, पोहवा शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, संदीप हांडगे, जालिंदर खराटे, सचिन पिंगळ या पथकाने कारवाई केली.