जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:24 PM2020-09-02T23:24:17+5:302020-09-03T01:48:08+5:30
पिंपळगाव बसवंत : येथे गणपती विसर्जन करताना सहकाऱ्यांना वाचविताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाला, तर दुसºया एका घटनेत देवळा येथे सुटीवर आलेल्या जवानाचा बुडून मृत्यू झाला.
पिंपळगाव बसवंत : येथे गणपती विसर्जन करताना सहकाऱ्यांना वाचविताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाला, तर दुसºया एका घटनेत देवळा येथे सुटीवर आलेल्या जवानाचा बुडून मृत्यू झाला.
मंगळवारी गणेश विसर्जन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने महामार्गावरील कादवा नदी पुलावर दरवर्षाप्रमाणे पाळण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गणपती विसर्जन करताना तीन कर्मचारी कादवा नदीपात्रात बुडाले. या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी रवींद्र रामदास मोरे (३६) या कर्मचाºयाने पाण्यात उडी मारली. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी मोरे यास तत्काळ पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस सहाय्यक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ, पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव करीत आहेत.