दोन प्रवाशांवर नाशिकहून पुण्याला उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:16 PM2020-03-22T22:16:54+5:302020-03-22T22:20:32+5:30
ओझर : देशभर सर्वत्र जनता कर्फ्यूमुळे सारे काही थबकले असतानाच देशांतर्गत विमानसेवेलाही त्याची झळ पोहोचली. कोरोनाच्या धास्तीमुळे हैदराबाद-नाशिक-पुणे हे ७० आसनी विमान नाशिक विमानतळावर पोहोचले ते २६ प्रवासी घेऊन, मात्र पुढे त्याने केवळ दोन प्रवाशांना घेऊनच पुण्याला उड्डाण केले.

नाशिक विमानतळावर सकाळच्या सत्रात ये-जा करणारी दोन विमाने आहेत. त्यात प्रमुख्याने हैदराबाद व पुणे येते. हैदराबादहून नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या ७० आसनी विमानातून अवघे २६ प्रवासी आले, परंतु त्यातील २४ प्रवासी नाशिकला उतरल्यानंतर अवघे दोन प्रवासी घेऊन विमानाने पुण्याला उड्डाण केले.ओझर विमानतळ येथे लॅँडिंग होताच प्रत्येक प्रवाशाला एक अर्ज देण्यात आला. त्यात नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल, मागील चौदा दिवस कुठे काय केले? बाहेर देशात प्रवास झाला का? वैद्यकीय माहितीत प्रवाशांना ताप, सर्दी, खोकला आहे का याची माहिती विचारली गेली.विमानतळाबाहेर येण्या आधी थर्मोमीटरने अंतर ठेवून प्रवाशाला ताप आहे की नाही याची कसून चौकशी केली जात होती. स्थानिक आरोग्य विभागातर्फेप्रत्येक येणाºया प्रवाशांची स्क्र ीनिंग, फ्लूची तपासणी करण्यात येत आहे. सदर मोहीम ही १६ मार्चपासून सुरू आहे. अन् कुटुंबीयांना आनंदविमानातून येणाºया प्रवाशांच्या घरच्यांनी आगमनद्वारावर मास्क लावत आपल्या नातेवाइकांची आतुरतेने वाट पाहिली. समोर मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, आई, वडील दिसताच नातेवाइकांना मोठा आनंद झाला होता. एरवी टॅक्सी करून नाशिक गाठणाºया प्रवाशांना यंदा घ्यायला स्वत: घरचे पालक आल्याने टॅक्सीचालकांना मोठा आर्थिक फटका बसला.