श्रमिकनगर भागात प्राणघातक हल्ला करून सराफाला लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:16 AM2021-09-11T04:16:59+5:302021-09-11T04:16:59+5:30

नाशिक : सराफ व्यवसाय आटाेपून घरी जाणाऱ्या सराफास दाेघांनी लुटल्याची घटना सातपूरच्या श्रमिकनगर भागात ४ सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ ...

Two persons were arrested for robbing a bullion in Shramiknagar area | श्रमिकनगर भागात प्राणघातक हल्ला करून सराफाला लुटणाऱ्या दोघांना अटक

श्रमिकनगर भागात प्राणघातक हल्ला करून सराफाला लुटणाऱ्या दोघांना अटक

Next

नाशिक : सराफ व्यवसाय आटाेपून घरी जाणाऱ्या सराफास दाेघांनी लुटल्याची घटना सातपूरच्या श्रमिकनगर भागात ४ सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली हाेती. या प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या युनिट दाेनने कारवाई करीत संदीप अहिरे व रोहित भालेराव या दाेघा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले दुचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रमिकनगर येथील सराफ महेश दिलीप टाक ( २८) त्यांचे सोन्याचे दुकान बंद करून घरी जात असताना वृंदावन गार्डन, श्रमिकनगरजवळ त्यांना काही इसमांनी अडवून त्यांच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार करीत प्राणघातक हल्ला करून त्यांच्या गळ्यात अडकवलेली कागदपत्र असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांना गुन्ह्यातील आरोपी फाशीचा डोंगर, जलशुद्धिकरण केंद्र याठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास १४.०० वा. सापळा लावून संदीप चिंतामण अहिरे(वय ३३, रा. शिवशक्ती रो. हाउस नं १, गंगासागर नगर) व रोहित रामचंद्र भालेराव, (३०, रा. हंसकुटी रो हाउस, हिंदी शाळेजवळ, सातपूर) या दोघांना अटक केली, तर त्याच्या चौकशीतून त्यांचे अन्य तीन साथीदार जावेद ऊर्फ साजन अन्सारी, अमजद खान, प्रतीक एकडे यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून अन्य तिघांचाही शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच १५ एफई ८७१०) जप्त केली आहे.

Web Title: Two persons were arrested for robbing a bullion in Shramiknagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.