दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:11 AM2018-03-31T00:11:13+5:302018-03-31T00:11:13+5:30

इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीची चोरी करून दुचाकी विक्र ी करणाऱ्या टोळीला घोटी पोलिसांना पकडण्यात यश आले असून, या सात जणांच्या टोळीकडून सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

 Two-wheeler gang racket | दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

घोटी : इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीची चोरी करून दुचाकी विक्र ी करणाऱ्या टोळीला घोटी पोलिसांना पकडण्यात यश आले असून, या सात जणांच्या टोळीकडून सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घोटी शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. या चोरट्यांना पकडण्याचे गंभीर आव्हान घोटी पोलिसांसमोर उभे राहिले होते. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे यांनी विशेष पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना दिल्या होत्या. यानुसार या पथकाची नेमणूक करण्यात आली होती.
घोटी पोलिसांची कामगिरी
पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, पोलीस नाईक विश्वास पाटील, शीतल गायकवाड, गणेश सोनवणे, कृष्णा कोकाटे, कासार, सानप, मथुरे चालक नितीन भालेराव आदींच्या पथकाने घोटी शहरात सापळा रचला असता अमोल क्षीरसागर, रा.घोटी, नामदेव वारघडे, रा.गोवंडी, रत्नेश राय रा.गोवंडी, सचिन म्हसणे, रा.फांगुळ गाव, सुभाष सगभोर, रा. वाकी (अकोले), कैलास शेळके, रा. अकोले, योगेश उघडे, रा. अकोले या सात संशयिताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या ताब्यातील सात दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या.

Web Title:  Two-wheeler gang racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.