ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:07 PM2020-07-06T17:07:49+5:302020-07-06T17:08:07+5:30

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतून मार्गस्थ होताना रात्रीच्या वेळी रस्त्यावर चालणाऱ्या एका आयशर ट्रकने अचानकपणे लेनकटींग करत कुठल्याहीप्रकारचा इशारा ...

The two-wheeler was killed on the spot in the collision of the truck | ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार

Next

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतून मार्गस्थ होताना रात्रीच्या वेळी रस्त्यावर चालणाऱ्या एका आयशर ट्रकने अचानकपणे लेनकटींग करत कुठल्याहीप्रकारचा इशारा न करता किंवा इंडिकेटर न सुरू करताच रस्त्यावरील लेन बदलल्यामुळे ट्रकच्या पाठीमागून येत असलेल्या दुचाकीस्वाराचा गोंधळ उडाला आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी पाठीमागून जाऊन ट्रकवर आदळली. या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, दुचाकीचालक मुकेश लक्ष्मण नवले हे त्यांच्या दुचाकीने (एम.एच.१५ ईएम ७७६६) एक्स्लो पॉइंटकडे रात्रीच्या वेळी जात होते. यावेळी त्यांच्या समोर रस्त्यावर चालत असलेल आयशर ट्रकच्या (एम.एच.०४ एचडी४८२९) चालकाने रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज न घेता बेदरकारपणे कुठल्याहीप्रकारचा इशारा न देताच अचानक रस्त्याची बाजू बदलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे ट्रकमागे दुचाकीवर प्रवास करणा-या मुकेश यांचा गोंधळ उडाला आणि त्यांची दुचाकी आयशर ट्रकवर जाऊन आदळली. डोक्यावर हेल्मेट परिधान न केल्यामुळे जबर मार लागल्याने ते जागीच मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेप्रकरणी योगेश नवले (रा.कामटवाडे ) यांनी दिलेल्या तक्र ारीवरून अंबड पोलीस ठाण्यात आयशरट्रकच्या चालकाविरूध्तद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश नवले हे गुरूवारी (दि.३) रात्री एमएच १५ ईएम ७७६६ या दुचाकीने अल्फा कंपनीकडून एक्स्लो पॉर्इंटच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पुढील तपास उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.

Web Title: The two-wheeler was killed on the spot in the collision of the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.