लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : ऐतिहासिक शेतकरी संपाची सुरु वात कसबे सुकेणे येथे लाक्षणिक उपोषणाने झाली असून आज गुरु वारी कसबे सुकेणे शहर व परिसरातील सर्व गावांनी या संपात सहभागी होत कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याची जोरदार मागणी केली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओने, थेरगाव, दात्याने, जिव्हाळे, दिक्षी या भागातील हजारो शेतकरी गेल्या आठवड्यापासून संघटित होऊन आज कसबे सुकेणे येथे रस्त्यावर उतरले. सकाळी ८ वाजेपासून कसबे सुकेणे बसस्थानकाजवळ शेकडो शेतकरी एकत्र झाले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत सर्वपक्षीय शेतकरी आजपासून लाक्षणिक उपोषणास बसले असून, जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत हे लाक्षणिक उपोषण सुरू राहील, असे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी सरपंच नाना पाटील, बाळासाहेब जाधव, वासुदेव काठे, अशोक जाधव, बाजीराव पाटील, शंकरराव पूरकर, अर्जुन बोराडे, भगवान बोराडे, सदाशिव शेवकर यांनी सरकारच्या धोरणावर आसूड ओढत निषेध नोंदविला व कर्जमाफी देण्याची मागणी केली. तसेच आगामी संप काळात मुंबई व नाशिकला भाजीपाला व दुधाचा पुरवठा केला जाणार नाही, असा ठाम निर्धार करीत उपोषणाला सुरु वात केली. याप्रसंगी परशराम भंडारे, जगन शेवकर, विश्वास पूरकर, सुहास भंडारे, दत्तात्रय जोंधळे, नाना पाटील, भाऊ शेटे, सचिन मोगल, अशोक मोगल, प्रवीण जाधव, शंकर पूरकर, रामकृष्ण बोंबले, मनोहर जाधव, संजय गुंजाळ, भगवान बोराडे, प्रमोद गांधी, परेश भार्गवे आदी शेतकरी सहभागी होऊन उपोषणाला बसले आहेत.
कसबे सुकेणेत लाक्षणिक उपोषण
By admin | Published: June 02, 2017 12:13 AM