- नामदेव भोर
नाशिक - माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगल्यांची मालमत्ता खरेदी केली, मात्र आयकर विभागाला ती दाखवली नाही. त्यामुळे त्यांची चोरी पकडली गेली असून उद्धव ठाकरे यांना या गायब केलेल्या १९ बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागणार असल्याचा इशारा भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
नाशिकमध्ये अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेच्या कार्यक्रमांनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ठाकरे कुटुंबियासंह संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी आएनएस विक्रांत प्रकरणात आरोप केले मात्र ते ५७ हजाराचे कागद देऊ शकले नाही. या आरोपनांतर १२० दिवस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ते १२० रुपयांचाही कागद देऊ शकले नाही. या प्रकरणावरून हायकोर्टानेही त्यांना फटकारल्याचे नमूद करताना बोगस एफआयआर दाखल करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप करिट सोमय्या यांनी यावेळी केला. दरम्यान, सीमावादाच्या प्रश्नावर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सरकराचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढचे लक्ष अनिल परबराज्यातील विविध राजकीय नेत्यांवर आर्थिक गैरव्यवारांचे आरोप करीत त्यांची पोलखोल करणारे किरिट सोमय्या यांनी पुढचे टारगेट माजी परिवहन मंत्री अनिल परब अल्याचे संकेत देतानाच त्यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत त्यांनाही हिशोब चुकता करावा लागणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
मुंबई महापालिकेचे ऑडिट होणाराचकोरोना काळातील ऑडिटचे मुंबई पालिका आयुक्तांना का वाटते असा सवाल करतानाच कोरोना काळातील आरोग्य साहित्य खरेदीचे ऑडिट होणार असल्याचे सोमय्या यांनी सष्ट केले. किशोरी पेडणेकर यांनी स्वतः कॉर्पोरेट कंपनी बनवून कॉन्ट्रॅक्ट घेतले. सुजित पाटकर यांच्या कंपनीने शंभर कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला. कोरोना काळात यांनी दोन रुपयाची वस्तू दोनशे रुपयाला खरेदी केली. यात पुरवठा करणाऱ्या ११ कंपन्या बोगस असून महापालिका आयुक्त नेमके कोणाला वाचवायचा प्रयत्न करीत असल्याचा हा प्रश्न असल्याचे सोमय्या यांनी उपस्थित केला आहे,