संगमेश्वरात वीस दिवसांपासून अघोषित वीज भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:13 AM2021-04-06T04:13:16+5:302021-04-06T04:13:16+5:30

यात वीज नसल्याकारणाने कोलमडलेली व्यापार व्यवस्था ,रात्री मच्छरांच्या उच्छादामुळे वाढणारी रोगराई आदी समस्यांचा पाढाच वाचण्यात आला विशेषतः तक्रार विभागाचे ...

Unannounced power load regulation in Sangameshwar for twenty days | संगमेश्वरात वीस दिवसांपासून अघोषित वीज भारनियमन

संगमेश्वरात वीस दिवसांपासून अघोषित वीज भारनियमन

Next

यात वीज नसल्याकारणाने कोलमडलेली व्यापार व्यवस्था ,रात्री मच्छरांच्या उच्छादामुळे वाढणारी रोगराई आदी समस्यांचा पाढाच वाचण्यात आला विशेषतः तक्रार विभागाचे संपर्क क्रमांक वेळेवर लागत नाही संबंधित व्यक्ती उडवाउडवीची उत्तर देतात तक्रारीची योग्य दखल घेतली जात नाही.

कोरोना परिस्थितीमुळे शासनाने दिलेल्या नियमावलीने रोजगार व्यावसायिक अडचणीत आला असून सक्तीची वीज बिल आकारणी केली जात आहे. वेळप्रसंगी वीज जोडणी तोडून खंडित केली जात आहे. अशी सक्ती टाळण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी मालेगाव विद्युत वितरण प्रा. लि. कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संगमेश्वरासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारु मोतीबाग नाका परिसरात विद्युत भार विभागणी आठवडाभरात करून समस्येचे निराकरण केले जाईल. सक्तीच्या वीज बिलाची वसुली व तोडणी संदर्भात वरिष्ठांसमवेत बैठक घेऊन योग्य मार्ग काढू असे आश्वासन देण्यात आले. यावेळी मंचचे नेवीलकुमार तिवारी, दीपक पाटील, मंगेश बिरारी, अनिल पाटील, निलेश पाटील, निलेश सोनवणे,लतिकेश सोनवणे,शाम देवरे,भूषण बागुल,बंटी शेलार,गणेश जंगम,शुभम खैरनार,सचिन परदेशी, राहुल मोरे, सागर उदागे आदी उपस्थित होते.

Web Title: Unannounced power load regulation in Sangameshwar for twenty days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.