सटाण्यात अनधिकृत भाजीपाला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:10 PM2017-12-13T13:10:05+5:302017-12-13T13:10:15+5:30

सटाणा : राज्य शासनाने शेतकºयांना आडतमुक्त केले असतांना शहरात मात्र अनिधकृतपणे भाजीपाला मार्केटद्वारे दिवसाढवळ्या दहा टक्के कमिशन वसूल करून शेतकºयांचा खिसा कापला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हे अनधिकृत भाजीपाला मार्केट सुरु आहे. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे अनेक वेळा तक्र ारी केल्या मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याने प्रशासन संशयाच्या भोवºयात सापडले आहे.

Unauthorized Vegetable Market in the Stack | सटाण्यात अनधिकृत भाजीपाला बाजार

सटाण्यात अनधिकृत भाजीपाला बाजार

googlenewsNext

सटाणा : राज्य शासनाने शेतकºयांना आडतमुक्त केले असतांना शहरात मात्र अनिधकृतपणे भाजीपाला मार्केटद्वारे दिवसाढवळ्या दहा टक्के कमिशन वसूल करून शेतकºयांचा खिसा कापला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हे अनधिकृत भाजीपाला मार्केट सुरु आहे. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे अनेक वेळा तक्र ारी केल्या मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याने प्रशासन संशयाच्या भोवºयात सापडले आहे.
राज्य सरकारने गेल्या ५ जुलै २०१६ पासून आड्तीच्या जोखडातून शेतकºयांना मुक्त केले.तसा अध्यादेशही काढण्यात आला आहे.या निर्णयामुळे शेतकºयांची वर्षानुवर्षापासून सुरु असलेली लुट बंद झाली आहे.एकीकडे शासन शेतकºयांना आडतमुक्त करत असतांना दुसरीकडे मात्र शासन निर्णयाची पायमल्ली होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत.सटाणा शहरातील अहिल्याबाई होळकर चौका लगत असलेल्या पालिकेच्या बाजार ओटे आहेत.याठिकाणी दररोज सकाळी भाजीपाला मार्केट भरते मात्र ते अनिधकृत. तालुका व परिसरातील शेतकºयांकडून मोठ्याप्रमाणात भाजीपाला विक्र ीसाठी आणला जातो .रोज सकाळी ७ वाजता कोणताही परवाना नसलेले भाजीपाला व्यापारी लिलावात सहभागी होतात.ज्या आडत्याकडे माल लावला त्या आडत्याकडून माल विक्र ी झाल्यानंतर चक्क दहा टक्के आडत कापली जाते.याबाबत कोणी तक्र ार केल्यास हे नगरपालिका क्षेत्र असल्यामुळे आडत लागू असल्याची उडवाउडवी केली जाते.शेतकºयांना दिल्या जाणाºया भाजीपाला विक्र ीच्या पावत्यांवर संबधित आडत्याचा परवाना नंबर नाही .विशेष म्हणजे मालाची जात असलेल्या रकान्यातच कमिशनची रक्कम नमूद केली जाते.या अनिधकृत भाजीपाला मार्केटमुळे गेल्या अनेक वर्षांपासून लाखो रु पयांची लुट केली जात असून याबाबत सहाय्यक निबंधक तसेच सटाणा बाजार समितीकडे अनेक वेळा तक्र ारी केल्या मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकºयांकडून केली जात आहे.
दररोज होते लाखोंची उलाढत ......
या अनिधकृत भाजीपाला मार्केटमध्ये दररोज बागलाण,कळवण ,देवळा तालुक्यातून मोठ्याप्रमाणात शेतकरी माल
विक्र ीस आणतात .मिरची ,शिमला मिरची ,फ्लोवर ,कोबी ,काकडी ,टमाटा ,शेवगा ,गाजर,मुळा ,कोथंबीर ,मेथी ,वांगी अशा विविध फळ व पाल्याभाज्या विक्र ीस असतात.किरकोळ विक्र ेत्यांकडून हा माल खरेदी केला जातो.दररोज शेकडो क्विंटल माल खरेदी ,विक्र ीमुळे लाखोंची उलाढाल होते. या व्यवहारातून अनधिकृत आडतदारांची चांदी होते तर दुसरीकडे शेतकºयांची दिवसाढवळ्या लूट होत आहे.

Web Title: Unauthorized Vegetable Market in the Stack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक