लासलगाव बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:22 AM2019-08-09T01:22:10+5:302019-08-09T01:23:31+5:30
नाशिक : देशातील अग्रगण्य अशा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या विरोधात अकार्यक्षमता आणि मनमानी कारभाराचा ठपका ठेवत १३ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातील चर्चा सुरू होती. दरम्यान, ठरावाची प्रत जिल्हा उपनिबंधकांकडे देखील देण्यात आली आहे.
नाशिक : देशातील अग्रगण्य अशा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या विरोधात अकार्यक्षमता आणि मनमानी कारभाराचा ठपका ठेवत १३ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातील चर्चा सुरू होती. दरम्यान, ठरावाची प्रत जिल्हा उपनिबंधकांकडे देखील देण्यात आली आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा सदस्यांपैकी १३ संचालकांनी सभापती होळकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सभापतिपदी विराजमान असलेल्या होळकर यांच्यावर बाजार समितीमध्ये सुरू असलेला मनमानी कारभार, पोटनियमाविरुद्ध काम करणे, दिलेला शब्द न पाळणे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय न घेणे, संस्थेच्या विरोधात निर्णय घेणे असे गंभीर स्वरूपाचे आरोप करीत १३ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. होळकर यांच्या कारकिर्दीला अडीचवर्ष पूर्ण झाल्यानंतर येथील सभापतिपदा-वरून राजकीय समीकरणे सातत्याने बदलली जात होती. दुसºयांदा सभापती झालेल्या होळकर यांच्याविषयी विद्यमान संचालकांकडून सात्याने मनमानी कारभाराचा आरोप करण्यात येत असल्याने होळकर यांच्याविरोधात कधीही अविश्वास ठराव दाखल होऊ शकतो अशी चर्चा असतांनाच गुरूवारी (दि.८) संचालकांनी जिल्हाधिकारी आणि तसेच जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन अविश्वास ठराव दाखल केला. या ठरावावर संचालक पंढरीनाथ थोरे ,राजेंद्र डोखळे,नानासाहेब पाटील, सुभाष कराड, शिवनाथ जाधव , सौ.प्रिती बोरगुडे,सौ.सुवर्णा जगताप, रमेश पालवे, वैकुंठ पाटील , नंदकुमार डागा, मोतीराम मोगल, सौ.अनिता सोनवणे, भास्करराव पानगव्हाणे यांच्या स्वाक्षरी असल्याचे समजते.
देशात अग्रगण्य समजल्या जाणाºया नामवंत अशा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरून येथे नेहमीच वादंग राहिला आहे. यापूर्वी देखील सभापतीपदाच्या अडीचवर्षाच्या कार्यकाळाच्या शब्दावरून आमदार छगन भुजबळ यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यावेळी देखील बहुसंख्य संचालकांनी आक्रामक भूमिका घेतली होती. आता होळकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याने बाजारसमितीचे राजकारण पुन्हा एकदा रंगणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. संचालक पंढरीनाथ थोरे यांनी अविश्वास ठरावासाठी पुढाकार घेतल्याने समजेत.