सप्तशृंग गड कोरोनाच्या सावटाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:45 PM2020-03-20T14:45:03+5:302020-03-20T14:45:18+5:30
सप्तशृंग गड:कोरोनाच्या सावटाखाली असल्याने शुकशुकाट कळवण :सप्तशृंग गड:कोरोनाच्या सावटाखाली असूनमंदीर, ट्रॉली, दुकान, लॉज, एस टी बस, खासगी वाहतूक बंद ...
सप्तशृंग गड:कोरोनाच्या सावटाखाली असल्याने शुकशुकाट
कळवण :सप्तशृंग गड:कोरोनाच्या सावटाखाली असूनमंदीर, ट्रॉली, दुकान, लॉज, एस टी बस, खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर दैनंदिन धार्मिक विधी व्यतिरिक्त बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे. येत्या २ ते ८ एप्रिल या कालावधीत होणार्या चैत्रोत्सवावर करोनाचे सावट पडले असून, भाविक, पर्यटक यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा भाग समजून यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे
यात्रोत्सवानिमित्त सप्तश्रुंग गडावर लाखो भाविकांची रेलचेल सुरू असते. फनिक्युलर ट्रॉलीचे आकर्षण म्हणून या परिसरातही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मंदिर बंद म्हटल्यावर ट्रॉलीदेखील बंद राहणार आहे. स्थानिक ग्रामस्थ व त्यांची वाहने वगळता नांदूरीहून गडावर ये-जा करणार्या सर्वच परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच खासगी वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सप्तशृंगी देवी गडावरील सर्व दुकाने, लॉजिंग करोना विषाणूच्या धर्तीवर बंद ठेवण्याचा निर्णयही स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी मंडळीने घेतला आहे. करोनाच्या धास्तीने गडावर येणार्या भाविक, पर्यटकांची रेलचेल काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यावर व दुकानांमध्ये शुकशुकाट पसरल्याचे निदर्शनास येत आहे. चैत्रोत्सवानिमित्त दोन पैसे पदरात पडले असते असे म्हणणारे व्यावसायिक बैठकीनंतर आधी आरोग्य महत्त्वाचे मग यात्रा असे म्हणत आपल्या व भाविक, पर्यटकांची काळजी वाहू लागल्याचे दिसून आले.
दरम्यान, देवस्थान ट्रस्ट कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांना आपल्या व दुसर्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. सप्तशृंगी देवी गडाच्या इतिहासात चैत्रोत्सवावरकरोनाचे विरजण पडले असून, यात्रोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपर्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांची मांदियाळीगडावर येऊ शकणार नाही. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये. चैत्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी गडावर येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापन, ट्रॉली प्रशासन, ग्रामपंचायत विभाग व स्थानिक ग्रामस्थ यांनी संयुक्तकरित्या निर्णय घेत यात्रोत्सव रद्द केला.