आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा १९ एप्रिलपासून ;पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:38 PM2021-03-15T18:38:35+5:302021-03-15T18:45:17+5:30

राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता या परीक्षा १९ एप्रिलपासून होणार आहे. पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते. मात्र राज्यातील विविध जिल्हयांमध्ये कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

University of Health Sciences Undergraduate Examination from 19th April | आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा १९ एप्रिलपासून ;पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा १९ एप्रिलपासून ;पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल

Next
ठळक मुद्देआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा वेळापत्रकात बदलराज्यातील कोरोना परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सुधारीत वेळापत्रकानुसार ९ एप्रिलपासून परीक्षा होणार

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा दि. १९ एप्रिल २०२१ पासून पुढे घेण्यात येणार असून यासंदर्भातीव सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.
राज्यातील विविध जिल्हयांमध्ये कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून कोरोनाचा संसर्ग पसरु नये तसेच अनेक ठिकाणी जाहिर करण्यात आलेली टाळेबंदी व निर्बंधामुळे विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आल्या आहे. पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते.परंतु, विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील परीक्षार्थींचे आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर, सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, परीक्षे संदर्भातील अद्यावत माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक माहितीविषयी खात्री करून घेण्याचे आवाहनही डॉ. अजित पाठक यांनी केले. दरम्यान, प्रथम व द्वितीय वर्ष उन्हाळी - २०२० परीक्षांचे समचिकित्सा, आयुर्वेद, भौतिकोपचार विद्याशाखांचे निकाल प्रक्रियेचे कामकाज सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंतीम वर्ष परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच
अंतीम वर्षाच्या परीक्षा ८ मार्च २०२१ पासून सुरु असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षा नियमित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येत आहेत. तसेच लेखी परीक्षेनंतर तत्काळ विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी इंटर्नशीप करावी लागणार असून या संबधित विद्यार्थ्यी कोविड-१९ रुग्ण सेवेकरीता उपलब्ध होणार आहे- अजित पाठक , परीक्षा नियंत्रक , महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

Web Title: University of Health Sciences Undergraduate Examination from 19th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.