सकारात्मक धोरण आखून दुष्काळावर मात करा - उद्धव ठाकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 04:52 AM2018-11-04T04:52:29+5:302018-11-04T04:52:45+5:30
राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. काही दिवसांत हा दुष्काळ रौद्ररुप धारण करेल. त्यामुळे सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न न करता सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी आणि कायमस्वरूपी उपाय करावेत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
ओझर (जि. नाशिक) - राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. काही दिवसांत हा दुष्काळ रौद्ररुप धारण करेल. त्यामुळे सरकारने केवळ वेळ
मारून नेण्याचा प्रयत्न न करता सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी आणि कायमस्वरूपी उपाय करावेत, असे आवाहन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
पिंपळगाव बसवंत येथे ग्रामीण रुग्णालय, निवासी शाळा, जर्मन तंत्रज्ञानाचे रस्ते आदी ३०० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण
व भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, मी सरकारवर टीका करत नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचे बोलत असतो. कर्जमाफी दिल्याचा सरकार दावा करते, मात्र प्रत्यक्षात शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने आढावा घेऊन पारदर्शक कर्जमाफी देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
टोमॅटो व इतर शेतमालाच्या निर्यातीसाठी पाकिस्तान-बांगलादेश यांच्या सीमा खुल्या व्हाव्यात यासाठी मंत्री खासदार-आमदार सर्वांनी एकत्र यावे व शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली काढावा, असा सल्लाही त्यांनी दिला.