शहरात आज १०६ केंद्रांवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 01:37 AM2021-07-12T01:37:35+5:302021-07-12T01:38:24+5:30
तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून पुन्हा शहरात १०३ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्येक केंद्रावर केवळ ७० लसीच उपलब्ध राहणार असल्याने, केवळ लवकर नंबर लावणाऱ्यांनाच लस मिळू शकणार आहे.
नाशिक : तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून पुन्हा शहरात १०३ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्येक केंद्रावर केवळ ७० लसीच उपलब्ध राहणार असल्याने, केवळ लवकर नंबर लावणाऱ्यांनाच लस मिळू शकणार आहे.
महानगराच्या पूर्व विभागात १५ , नाशिक रोड विभागात १९, पश्चिम विभागात १६, सातपूर विभागात १३, पंचवटी विभागात १६ तर सिडको विभागात सर्वाधिक २४ केंद्रांवर लसीकरण करण्याची सुविधा सोमवारी उपलब्ध राहणार आहे. या सर्व १०३ केंद्रांवर केवळ कोविशिल्डचीच लस उपलब्ध राहणार आहे, तर पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय, समाज कल्याण कार्यालय आणि सातपूरच्या इएसआयसी रुग्णालय या ३ ठिकाणी केवळ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.