ब्राह्मणगाव : येथे प्राथमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वय वर्षे ४५ च्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असून, लसीकरणाआधी प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना चाचणीत आता जवळजवळ सर्वच निगेटिव्ह येत असल्यामुळे आरोग्य यंत्रोवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस ८४ दिवसांनी देण्यात येत आहे.लसीकरणासाठी आता नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, आरोग्य खात्याकडून १८ वयोगटापुढील व्यक्तींनाही लवकर लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. गावात कोरोनाचे रुग्ण संख्या खूपच घटली आहे. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वात जास्त लसीकरण करणारे केंद्र ठरले आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे, डॉ. अतुल गोपणारायन, औषध निर्माता जगताप, आरोग्यसेविका मनाली हिरे, वैशाली शिरोळे, क्षमा वाघ, बागुल, सुभाष देवरे, आप्पा साबळे, समाधान मोरे, सचिन बधाने, सोनवणे, जेजुरकर, गीतांजली काळे, सारिका लोखंडे, तसेच आशा कर्मचारी परिश्रम घेत आहेत.प्राथमिक शाळेत सुरू असलेले लसीकरण.
ब्राह्मणगाव केंद्रात कोरोना चाचणीनंतर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 10:59 PM
ब्राह्मणगाव : येथे प्राथमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वय वर्षे ४५ च्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असून, लसीकरणाआधी प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना चाचणीत आता जवळजवळ सर्वच निगेटिव्ह येत असल्यामुळे आरोग्य यंत्रोवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस ८४ दिवसांनी देण्यात येत आहे.
ठळक मुद्देआरोग्य यंत्रोवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.